टीम मंगळवेढा टाईम्स ।
बँकेच्या नावाखाली कारखान्याचा लिलाव काढून दुसऱ्याच्या नावावर तो कारखाना घेऊन स्वतःच्या मालकीचा करण्याचा डाव अध्यक्ष भगीरथ भालके यांचा असल्याचा खळबळजनक आरोप संचालक युवराज पाटील यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य बँकेचे जवळपास ४०० कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे त्याचे हप्ते वेळेवर गेले नाहीत. कर्जाचे पुनर्गठणही झाले नाही.
याबाबत वेळोवेळी कायदेशीर नोटिसा तडजोडीचा मार्ग बँकेने अवलंबूनही कारखान्याकडून कर्जाचे पैसे भरले जात नसल्याने १४ डिसेंबर रोजी कारखान्याची तारण मालमत्ता राज्य बँकेचे अधिकारी ताब्यात घेण्यासाठी कारखान्यावर येत आहेत.
भगीरथ भालके यांना कर्जाचे पुनर्गठण करून कारखाना सुरू करणे शक्य असतानाही तसे न करता सर्व संचालक, सभासदांना त्यांनी वेड्यात काढण्याचे काम केले असल्याचा आरोप युवराज पाटील यांनी केला.
शेवटची संधी म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील दोन महिन्यापूर्वी पुण्यात बैठक घेऊन बँकेचे अधिकारी व कारखाना प्रशासनात समन्वय घडविला.
अवघे सहा कोटी रुपये भरून ४०० कोटी रुपये कर्जाचे पुनर्गठण करण्याची संधी त्यांनी दिली त्याला मुदतही दिली.
त्यावेळी कारखान्याच्या खात्यावर को-जनरेशनचे ६ कोटी रुपये शिल्लक होते पैसे भरून कर्जाचे पुनर्गठण करणे नवीन पैसे उपलब्ध करणे व कारखाना सुरू करणे हे शक्य असतानाही भगीरथ भालके यांनी तसे प्रयत्न जाणूनबुजून केले नाहीत, असा आरोपही पाटील यांनी केला.(स्रोत:लोकमत)
दररोज नवीन पार्ट्याना कारखाना दाखविला जातो
एकीकडे बँकेची कारवाई सुरू असताना तिथे पैसे भरले जात नाहीत. तिथे मार्ग काढणे बाजूला राहिले. मात्र विद्यमान अध्यक्ष भगीरथ भालके नॉट रिचेबल राहतात व स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींना पुणे, कोल्हापूर,
मंगळवेढा परिसरातील इतर उद्योगपतींना कारखान्यावर नेऊन तुम्ही पैसे द्या , तुम्हाला कारखाना देतो , अशा तडजोडी खासगी सुरु आहेत.
हा डाव आम्ही सर्व संचालक,शेतकरी हाणून पाडणार असल्याचे युवराज पाटील म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा