मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार करण्यासाठी आलेल्या एका वृद्धास केळीतून गुंगीचे औषध देवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ११ हजार रुपये किमतीचा ऐवज लूटून नेल्याची घटना नूकतीच घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी रामकृष्ण पांडुरंग लवटे (वय.७५ रा.जित्ती,ता.मंगळवेढा) हे वृद्ध शेतकरी असून आठवडा बाजारसाठी मंगळवेढयात आले होते. बोराळे नाक्यावर असताना एका अनोळखी व्यक्तीने येवून रामराम पाहुणे असे म्हणून कसे काय बरे आहात का अशी चौकशी करत चला चहा पिवू या असे म्हणून नाक्यावरील विजय हॉटेलमध्ये चहा पिण्यास घेवून गेले.चहा पिवून बाहेर आल्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने माइया भावाची मुलगी बोराळे रोडवरील विटभट्टीवर आहे तीला जावून भेटून येवू असे म्हणून फिर्यादीस घेवून गेले. व एका लिंबाच्या झाडाखाली बसवून केळी खायला दिली.
केळी खाल्ल्यानंतर पाणी पिवून गप्पा मारत बसल्यानंतर फिर्यादीस गुंगी आल्याने सकाळी १० च्या सुमारास तो वृद्ध तेथेच झोपी गेला. गुंगी आल्याचे पाहून अज्ञात चोरटयाने बनियनच्या खिशातील ५०० रुपये रोख रक्कम व अडीच ग्रॅम सोन्याचे बदाम असा ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दि. 9 रोजी गुंगी आल्याने झोपलेले फिर्यादी दि.10 रोजी सकाळी 7.00 वा. जागे झाले.त्यावेळी चोरीची घटना उघड झाली.या चोरटयाला पकडणे पोलिसांना एक आव्हान आहे.यापुर्वीही एका सेवानिवृत्त शिक्षकाला गजबजलेल्या बसस्थानकासमोर तर नोव्हेंबर महिन्यात दामाजी चौकात प्रवासातून आलेल्या एका महिलेला लूटण्याचा प्रकार घडला होता.
या घटनेला सहा महिन्याचा कालावधी लोटत आला असतानाही अदयापही पोलिस त्या चोरांचा शोधच घेत आहेत.परिणामी या चोराला पकडण्यात पोलिसांना यश येईल का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.अधिक तपास पोलिस नाईक पोलिस नाईक रविराज खिलारे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा