महिला बचत गटाच्या छोट्या छोट्या उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार- सौ.अंजलीताई आवताडे - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

महिला बचत गटाच्या छोट्या छोट्या उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार- सौ.अंजलीताई आवताडे



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

महिला बचत गटाच्या छोट्या-मोठ्या उद्योगाना बाजारपेठ उपलब्ध करून देणार असे मत सौ. अंजलीताई अवताडे यांनी पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठ येथे समाधान दादा अवताडे युवा मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमात व्यक्त केला.





समाधान दादा अवताडे युवा मंच यांच्या वतीने पंढरपूर येथे पंढरपूर तालुका व शहरातील बचत गटाच्या महिलांसाठी महिला सशक्त बनवण्यासाठी सर्व बचत गटातील महिला यशस्वी  उद्योजक बनवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजाराम स्कूलच्या प्राचार्य रजनीताई जाधव ह्या होत्या. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण, दामाजी कारखान्याच्या संचालिका कविता निकम, डॉक्टर वृषाली पाटील, सौ. दुर्गा माने, सौ जयश्री भोसले समाजसेविका, सौ सुजाता मलपे समाजसेविका, प्रियांका लटके, सौ सुनीता पवार, आदी महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बचत गटाच्या महिलांना नवीन उद्योगाचे प्रशिक्षण देणे आणि यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते व ट्रेनर नंदकुमार दुपडे यांचे वेगवेगळया उद्योगासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण हे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये छोट्या-मोठ्या उद्योगातील प्रशिक्षणही देण्यात आले. व वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या धंद्याचे डेमो ही सादर करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी वेगवेगळ्या बचत गटाच्या वतीने वेगवेगळ्या प्रॉडक्टचे स्टॉल उभे करण्यात आले होते. यामधून बचत गटाच्या महिलांना नऊ उद्योगाचे चालना मिळावी म्हणून या स्टॉलची उभारणी करण्यात आली होती.  या कार्यक्रमाला हजारो महिलांचे हजेरी लागली असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. 

येणाऱ्या सर्व बचत गटातील महिलांना स्टॉल ठिकाणी नाष्टा व  चहाची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवढे स्टॉल विविध वस्तू घेऊन उभा करण्यात आले होते.त्या  स्टॉल मधील वस्तूंची विक्री भरपूर झाल्या व कुठल्याही प्रकारचा मान शिल्लक राहिला नाही.  यामुळे सर्व बचत गटांच्या महिलांमध्ये एक आनंदाचे वातावरण दिसून येत होते.या कार्यक्रमांमद्ये सूत्रसंचालन आभार अशोक उन्हाळे यांनी केले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा