मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा यात्रेत इलेक्ट्रिकल्स कामाकरिता आलेल्या परिवारातील पाळण्याजवळ खेळणाऱ्या चारवर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचाराची घटना घडली. संशयितास अटक झाली असून, न्यायालयाने त्याला १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इलेक्ट्रिकल्स काम करणारे गृहस्थ आपल्या पत्नी व दोन लहान मुलींसह राहुटी करून वास्तव्यास होते. यातील पीडित अल्पवयीन मुलीचे वडील मंगळवारी (दि.१४) रात्री ९ वाजता जेवणासाठी राहुटीत आले. नैताळे ते विंचूर रस्त्यावर बांबूच्या दुकानाजवळ आले असता त्यांना एका इसमाजवळ सदर पीडित मुलगी आढळली. तिला ताब्यात घेत तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले.
तातडीने या मुलीच्या पालकांनी सदर इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर संशयित इसमाचे नाव सुदाम भिका सोनवणे असे असून, तो निफाड तालुक्यातील कोळवाडीचा रहिवासी आहे. निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.बी. सानप यांनी सोनवणे यास गुन्हा दाखल करून अटक केली. सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित सुदाम भिका सोनवणे यांस निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात उभे करण्यात आले. न्या. आर. जी. वाघमारे यांनी संशयितास १७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास पोलिस उपअधिक्षक माधव रेड्डी, पोलिस निरीक्षक आर. बी. सानप करीत आहेत. पीडित चारवर्षीय बालिका तिच्या बहिणीसह यात्रेतील पाळण्याजवळ खेळत होत्या. त्यावेळी एका अज्ञात इसमाने बहिणीचे अपहरण केल्याची माहिती दुसऱ्या मुलीने तिच्या पालकांना सांगितली. लागलीच पीडित मुलीचे वडील व पाळण्याचे मालक दादा वसंत मोरे यांनी बालिकेचा शोध घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा