मंगळवेढ्यात करोनाचा पहिला बळी; ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

रविवार, १२ जुलै, २०२०

मंगळवेढ्यात करोनाचा पहिला बळी; ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू




टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या मंगळवेढा येथील ५५ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा रविवारी सकाळी 11 च्या सुमारास मृत्यू झाला आहे. करोनाचा हा मंगळवेढ्यातील पहिला बळी आहे. करोनाबाधिताच्या मृत्यूने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.


मंगळवेढाकरांनी वेळेत सावध भूमिका घेतली पाहिजे कोणीही विनाकारण घराबाहेर पडत असाल तर घराबाहेर पडणे बंद केले पाहिजे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ नाही लागणार त्यामुळे सर्वांनी घरीच राहून आपली व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.

साखर कारखान्यात काम करणार्‍या सदर इसमाचा अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आला होता. व त्याला सारीचा आजार असल्याचे अहवालात नमूद आहे. त्याचेवर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारदरम्यान त्याचे निधन झाले.


दरम्यान, किल्ला भागात राहणारा एक रूग्ण अपघात झाल्याने गेल्या दिड महिन्यापासून सोलापूर येथे उपचार घेत असून उपचारादरम्यान त्यास कोरोनादृश्य लक्षणे जाणवू लागल्याने त्याचेवर आरोग्य यंत्रणा विशेष लक्ष देवून असून मंगळवेढ्यातील आरोग्य यंत्रणाही अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

- हेही नक्की बाचा 

-:मंगळवेढा : व्हाट्सअप्पवर व्हायरल झालेली हॉस्पिटलची यादी; 'त्या' कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेले व्यक्ती, याबाबत प्रशासनाने दिली अधिकृत माहिती जाणून घ्या
Corona's first victim on mangalwedha; 55-year-old patient dies

---------------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा