दिलासा! मंगळवेढा तालुक्यात आज 61 जण कोरोना मुक्त, 'या' गावातील नव्या कोरोनाबाधितांची भर - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

दिलासा! मंगळवेढा तालुक्यात आज 61 जण कोरोना मुक्त, 'या' गावातील नव्या कोरोनाबाधितांची भर

 




टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत.आज 18 नव्या रुग्णांची वाढ झाली असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 1 हजार 189 वर गेली आहे. तर दिलासादायक बातमी म्हणजे आज एकाच दिवशी 61 जण कोरणा मुक्त होऊन घरी गेले आहेत.



आज दिनांक 30/09/2020 रोजी नागरिकांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 98 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.



वरील 98 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 17 आणि निगेटिव्ह 81 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक मौजे मंगळवेढा 12, दामाजीनगर 2, लेंडवेचिंचाळे 1 , खुपसंगी 1 , ब्रम्हपुरी 1 येथील आहेत.


सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT - PCR ) चा 1 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर येथील कोरोनो रूग्णाच्या निकटतम संपर्कातील आहेत.


मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 189 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 888 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.


सांगोला शहरतालुक्यात आज 36 नवीन कोरोना रुग्णांची नोंद ; दोघांचा मृत्यू


सांगोला शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असुन आज दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.जवळा आणि मांजरी येथील प्रत्येकी 1 पुरूष उपचारादरम्यान मयत झाले आहेत.


आज दिनांक 30/09/2020 रोजी नागरिकांचा स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.तसेच आज दिनांक 30/09/2020 रोजी 208 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.

वरील 208 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह -36 आणि निगेटिव्ह -172 जणांचे अहवाल आलेले आहेत. सदरचे नागरीक हे सांगोला 16 , कटफळ -2 , वाकी घे. 1 , वासुद 2 , गोडसेवाडी 1 , हलदहिवडी 1 , शिरभावी 3 , जवळा 1 , एखतपूर 2 , मांजरी 3 , सोनंद 1 , ढाळेवाडी 1 , खिलारवाडी 1 , चोपडी 1 येथील आहेत.


सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वव ( RT - PCR )चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.


सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 848 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 846 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 974 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे.


नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा