सोलापुरातील स्वीट मार्ट हॉटेल मालकाच्या आत्महत्याप्रकरणी १३ सावकारांचा शोध - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

सोलापुरातील स्वीट मार्ट हॉटेल मालकाच्या आत्महत्याप्रकरणी १३ सावकारांचा शोध




 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील शोक चौकातील रेणुका स्वीट मार्ट हॉटेलचे चालक केतन उपासे (वय ४०) यांच्या आत्महत्याप्रकरणी १३ खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. उपासे यांना ७३ लाख ५० हजार रुपयांसाठी १३ खासगी सावकार दमदाटी करत होते. 



त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देत होते. याला कंटाळून त्यांनी शुक्रवारी आत्महत्या केली होती. विजयकुमार उपासे (वय ७१, रा. गोली अपार्टमेंट, ७० फूट रोड सोलापूर) यांनी जेल रोड पोलिसात रविवारी फिर्याद दिली आहे. 



गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप तपास करीत आहेत.किरण आरगे, जयंत शेळके, अनिल लक्ष्मण जाधव, सोहम गायकवाड, शिवशरण अग्रवाल, पूजा अग्रवाल, सुभाष राजमाने (टेंभुर्णी), सोमा सावकार, बिरण्णा बहिरवाडे, काका जाधव, सुरेश कोकटनूर, अनिल अंमदाळे, अनिल होटकर, सुभाष जाधव या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.






Solapur Sweet Mart hotel owner's suicide case Search for 13 moneylenders 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा