उपळाईतील मुलीची आत्महत्या , संशयित पोलिस ठाण्यात हजर - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

उपळाईतील मुलीची आत्महत्या , संशयित पोलिस ठाण्यात हजर



टीम मंगळवेढा टाईम्स । माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील १७ वर्षीय मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील संशयित विक्रम विलास बोराडे हा गुरुवारी दुपारी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. 


३१ जुलै रोजी प्रीती सुधाकर अनभुले हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विक्रम बोराडे व विराज विजय कदम या दोघांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 


संशयितांनी प्रीती हिला सतत मानसिक त्रास दिला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही गायब होते.त्यापैकी विक्रम हा पोलिसांत हजर झाला. तर विराज अजून गायब आहे.विक्रम याला शुक्रवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. 


दरम्यान , त्यांना तातडीने अटक करण्याची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांच्याकडे केली होती.तसेच मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनीही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन यासाठी निवेदन दिले होते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा