कॉग्रेसच्या काळात मंगळवेढ्यास मोठा निधी दिला : उज्वला शिंदे काँग्रेसच्या महिला संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

कॉग्रेसच्या काळात मंगळवेढ्यास मोठा निधी दिला : उज्वला शिंदे काँग्रेसच्या महिला संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


काँग्रेस सत्तेत असताना मंगळवेढा तालुक्यासाठी मोठा निधी देऊन विकास केला आहे.केंद्रसरकार व राज्य सरकारच्या फसव्या घोषणेला समर्थपणे उत्तर देवून सर्वांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करीत मागच्या पन्नास वर्षात काँग्रेसने चांगले कार्य केले.पण भाजपाने फसव्या घोषणा केल्या त्यांचा पर्दाफाश येणाऱ्या निवडणूकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यानी करावा काँग्रेस पक्ष आपल्या विचारधारेवर निवडणूक लढणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या सौ.उज्वला शिंदे यांनी केले आहे.
त्या मंगळवेढा येथील दुर्गामाता नगर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या महिला सुसंवाद कार्यक्रमा प्रसंगी बोलत होत्या.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814

व्यासपीठावर जिल्हा अध्यक्षा सौ.इंदुमती अलगोंडा,उपाध्यक्षा सौ.सुवर्णा चेळेकर,कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव कालुंगे, तालुका अध्यक्ष सुरेश कोळेकर, मारुती वाकडे,सौ.शोभा कालुंगे,नगरसेविका राजश्री टाकणे,भागीरथी नागणे,पारुबा जाधव,पूनम घुले,भीमराव मोरे आदी उपस्थित होते. 


याप्रसंगी बोलताना शिंदे म्हणाल्या की,गेल्या साडेचार वर्षात जनतेच्या पदरात घोर निराशा अली आहे.मोदी सरकार विषयी आम्हाला बोलण्यास आत्ता कंटाळा आला आहे. गरीबांना मदत न करता श्रीमंतांना मदत करून देशाची लूट करत आहेत.खोटी आवश्वान देऊन सत्तेवर आले खरे मात्र शेतकऱ्यांना ज्या यातना भोगावे लागतात ते सरकारला कळणार नाही.

मोदी सरकार मुळे जवान मरत आहेत.युवकांची दिशाभूल केली आहे.मोदी अभिनय छान करत आहेत.त्यांनी एकदा चित्रपट करायला हवा.

मागल्या ५० वर्षात काँग्रेस सरकारने सर्वांना न्याय देण्याबरोबर देशाला प्रगती पथावर घेवून जाण्याचे काम केले आहे. आता सत्तेवर आलेल्या भाजपाने नुसत्या घोषणा दिल्या प्रत्यक्षात काहीच काम केले नसून आत्ता काँग्रेस पदाधीकारी यांना बळ मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रस्तावित सौ.अंजली मोरे यांनी तर सूत्रसंचालन डॉ.प्रा.लता माळी व आभार राजश्री टाकणे यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा