मंगळवेढ्यात अज्ञात कारणावरून एकाची हत्या;दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यात अज्ञात कारणावरून एकाची हत्या;दोघांविरुद्ध गुन्हा दाखल



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


मंगळवेढा तालुक्यातील मुढेंवाडी येथील सुभाष सोमा घोडके (वय.४५) या इसमाची अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने बोचकून खून केल्याप्रकरणी त्याच गावातील मरगु लक्ष्मण जावळे व धुळदेव उर्फ धुळा बाबुराव ठेंगील या दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,दि.१ ऑगस्ट रोजी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास मुंढेवाडी ते ब्रम्हपुरी रोडवर असलेल्या भडोळे माळाच्या पुढील मोहितेच्या पत्रा शेडमध्ये मयत सुभाष घोडके यास वरील आरोपींनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन डोक्यास अंगावर अज्ञात हत्याराने मारहाण करून व बोचकून त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत मोटारसायकल वर मध्यभागी बसवून रोडच्या बाजूस नेवून प्रेत ओळखू येवू नये म्हणून अंगावरील कपडे काढून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



याची फिर्याद मयताचा पुतण्या लक्ष्मण उर्फ अप्पा आबाजी घोडके यांनी दिली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा