मंगळवेढ्यात जनहितचे आज थाळीनाद आंदोलन     - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यात जनहितचे आज थाळीनाद आंदोलन    


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथे ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गाडे याच्यावरती विनाकारण कोणतीही त्यांच्याविरोधात तक्रार नसताना सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मार्कड व त्यांचे पाच पोलिस कर्मचारी यांनी अमानुषपणे काठीने मारहाण करून बोटाने लाथाडले त्यामुळे त्यांचे वरती त्वरित गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे व पोलीस प्रशासनाची होणारी बदनामी थांबवावी आज सोमवार दि. 19 रोजी 12 ते 5 या वेळेत डीवायएसपी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करणार असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.




यावेळी उपस्थित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख,मंगळवेढा वंचित आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष डि के साखरे, बसपा महासचिव येताला खरबडे, अन्यायग्रस्त सर्जेराव गाडे, दामाजी मोरे ,बलभीम माळी ,पप्पू दत्तू ,बाळासाहेब नागणे ,आबासो सावजी, महेश कवडे,अमोल माळी,असिफ तांबोळी,मधुकर कोंडुभैरी आदीजण उपस्थित होते.

तालुक्यातील नंदुर येथे आठ जून रोजी येथील ग्रामपंचायत सदस्य दलित समाजाचे निष्पाप सर्जेराव गाडी यांना मोबाईलचा रिचार्ज करण्यासाठी चौकात आले असता त्यांचे वरती अमानुषपणे काठीने मारहाण करून बोटाने लाथाडून माझ्यातील लोकप्रतिनिधीला भरचौकात अपमानास्पद वागणूक दिली त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर ती अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा नोंदवून निलंबित करण्यात यावे गेली चार दिवस बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून वरील संदर्भीय विषयातील वस्तुस्थिती खरी असून हे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व पोलिस उपविभागीय अधिकारी यांना सर्व वस्तुस्थिती माहिती असून असून आंधळ्याची व कान असून बहिरा ची भूमिका अधिकारी घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा