मोरे कुटुंबियांमुळे नागपंचमीसणाला उजाळा : शैला गोडसे - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

मोरे कुटुंबियांमुळे नागपंचमीसणाला उजाळा : शैला गोडसे


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पाठखल येथील मोरे कुटूंबियांमुळे नागपंचमी सणाला उजाळा मिळाला असल्याचे मत शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांनी व्यक्त केले त्या सौ.अंजली भीमराव मोरे यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.डॉ.प्रीती शिर्के,
जिल्हा परिषद सदस्या सौ.मंजुळा भारत कोळेकर,गजानन ज्वेलर्सच्या संचालिका डॉ.मोना जयदीप रत्नपारखी,सरपंच सौ.उषाताई बिले सौ रश्मी मर्दा,सौ.ज्योती मर्दा, सौ.मनिषा मर्दा,सौ.सुगंदा शहा यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 



शैला गोडसे पुढे म्हणाल्या की,आज प्रत्येक महिला घरातील कामातून बाहेर पडत नाही तिला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी सुध्दा वेळ मिळत नाही.पण मोरे कुटुंबीयांनी खास महिलांसाठी नागपंचमी प्रसंगी महिलांना बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मला माझ्या लहानपणाची आठवण आली.लहानपणी घेतलेला त्याचा आनंद आज पुन्हा घेण्यास मिळाला. पाटकळ येथील मोरे परिवारात येऊन मला माहेरी आल्या सारखे वाटत आहे. वर्षभर शेतात घरात काबाडकष्ट करून थकलेल्या माता-भगिनींना आज मुक्तपणे खेळून आपला क्षीण घालवण्याचा आजचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा