मंगळवेढ्यात पूर्ववैमनस्यातून सख्या पुतण्याची निर्घृण हत्या - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९

मंगळवेढ्यात पूर्ववैमनस्यातून सख्या पुतण्याची निर्घृण हत्या




मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील नवनाथ उत्तम शिंदे (वय.४०) यास पूर्ववैमनस्यातून रावसाहेब शंकर शिंदे (वय.७०) याने डोक्यास काठीने मारून हत्या केल्याची घटना आज सकाळी ११ च्या सुमारास पाठखल ते आंधळगाव रोडवर घडली आहे.



याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत नवनाथ हा आरोपी रावसाहेब शिंदे याचा सख्या पुतण्या असून मयत नवनाथ याने  त्याचा चुलतभाऊ परमेश्वर रावसाहेब शिंदे याचा ऑगस्ट 2015 मध्ये पूर्ववैमनस्यातून डोक्यात लोखंडी टॉमी घालून खून केला होता या प्रकरणी त्याला जामीन झाला होता त्यानंतर तो बाहेरगावी होता  तो आज दि 7 रोजी आपल्या आजारी मावशीला पाहण्यासाठी मावसभाऊ विकास शिंदे सह आला होता दरम्यान 11 च्या सुमाराला  मयत नवनाथ हा अंधळगाव येथील गावातल्या घरी  दारूच्या नशेत येऊन रावसाहेब यांच्या मुलीकडे तोंड करून लघवी करू लागल्यानंतर मुलीने भावाला फोन केला तदनंतर तो निघून गेला दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास रावसाहेब शिंदे  हे पाठखल रस्त्यावरील आपल्या शेतातल्या घराकडे जात असताना मयत नवनाथ व त्याचा मावसभाऊ विकास  हे तिथे  पिलेल्या अवस्थेत आले होते त्यावेळी पाठखल रस्त्यावर  नवीन पुलावजवल  रावसाहेब व नवनाथ यांचे दोघांची करबुर होऊन रावसाहेब शिंदे याने हातातील  काठीने नवनाथच्या डोक्यात व पोटावर  मारहाण केली. 

या मारहाणीत नवनाथ हा जागीच ठार झाला या घटनेनंतरही आरोपी रावसाहेब तिथेच थांबून होता व या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपी रावसाहेब यास ताब्यात घेतले  आहे  याप्रकरणी मयताचा मावसभाऊ  विकास शिंदे याने रावसाहेब शिंदे व त्याचा अल्पवयीन नातू या दोघांनी नवनाथ शिंदे चा काठीने डोक्यावर ,पोटावर मारून ठार मारल्याची फिर्याद दिली आहे






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा