मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील एका 14 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी आईने पोलिसात अज्ञात व्यक्तीविरूध्द फिर्याद दिली आहे.सिध्देश्वर बाळू कोकरे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी,बठाण येथील सिध्देश्वर बाळू कोकरे (वय 14) हा इयत्ता नववी वर्गात शिकत असून त्याचे दि.3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान गावातून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद शारदा बाळू कोकरे या महिलेने पोलिसांत दिली आहे.
अपह्त मुलगा सिध्देश्वर कोकरे हा उंचीने चार फुट असून सावळया रंगाचा आहे. अंगात निळया रंगाचा फुल शर्ट व काळया रंगाची पँट,डाव्या हातात लाल रंगाचा दोरा बांधलेला आहे. अशा वर्णनाचा मुलगा कोणाच्या नजरेस पडल्यास मंगळवेढा पोलिसांशी 02188/220333 या दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा