41 वर्ष नोकरी व सेवानिवृत्ती भाळवणीत - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

41 वर्ष नोकरी व सेवानिवृत्ती भाळवणीत



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथील पोस्ट कार्यालयातील पोस्टमन विजय हरिपंत कुमठेकर हे 41 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.




भाळवणी येथील रहिवाशी असलेले नोकरी आणि सेवानिवृत्ती एकाच गावात करण्याचा योग त्यांना आला ग्रामीण भागात संपर्कासाठी जी माध्यमे नसताना सायकल जाऊन जालीहाळ खवे येड्राव भाळवणी सायकलवर जाऊन खेडोपाडी पत्र मनीआर्डर तार रजिस्टर वेळेवर  देण्याचे काम त्यांनी प्रामाणिक पणे केले.

मंगळवेढा येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विष्णू चौगुले पांडुरंग चौगुले प्रभाकर कुमठेकर राजेंद्र कुमठेकर जालिंदर माने प्रवीण चव्हाण अशोक माने सुभाष साखरे दिगंबर साखरे वर्षा सुतार सायली कुमठेकर मोनाली भालेराव रमेश भंडगे ज्ञानेश्वर भंडगे  आण्णासाहेब आवळेकर  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी  बोलताना विष्णू चौगुले म्हणाले की गावाला आधात्मिक शिकवण देवून गावाला दिशा देण्याचे काम विजय कुमठेकर यांनी केले.नोकरी करताना प्रामाणिक पणा दाखवला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा