मंगळवेढा-पंढरपूर रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणता आला : आ.प्रशांत परिचारक - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढा-पंढरपूर रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणता आला : आ.प्रशांत परिचारक



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात सर्वात जास्त  रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचुन आणला असल्याचे मत विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंगळवेढा ते मारापुर-घरनिंकी जुना रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.



यावेळी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा,जिल्हा परीषद शिक्षण व आरोग्य समितीचे माजी सभापती शिवानंद पाटील,जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,शिवाजीराव नागणे, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,माजी नगरसेवक अरुण किल्लेदार,खन्ना माळी, पंचायत समितीचे माजी उपसभापती काशिनाथ पाटील,घरनिंकीचे सरपंच दगडू मुलाणी,तावशीचे सरपंच गणपत यादव,राजू पाटील,नंदकुमार हावनाळे,तम्मा जगदाळे आदीजन उपस्थित होते.

      
पुढे बोलताना आ.परिचारक म्हणाले की, मंगळवेढा-मारापुर घरनिंकी जुना रस्ता डांबरीकरण व्हावा यासाठी या भागातील कार्यकर्ते,शेतकरी सातत्याने मागणी करत होते.पदाधिकारी मात्र आपआपल्या भागातीलच कामे करत होती,परंतु दुर्लक्षित उपेक्षित असलेल्या भागाकडे कोणी मात्र पाहत नव्हते.या रस्त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसुलमंञी चंद्रकांतदादा पाटील,यांच्याकडे ग्रामसडक योजनेतून हा रस्ता सुचविला.आणि सहा किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यासाठी 3 कोटी 84 लाख  रुपये निधी मंजूर केला.

म्हैसाळ योजनेतील राहीलेली गावे  समाविष्ट करावी यासाठी त्या भागातील शेतक-यांची मागणी होती.त्यासाठी उद्या अधिका-यांसमवेत बैठक बोलावली आहे.सदर बैठकीस उद्या मुख्यमंत्री,जलसंपदामंञी असतील तर जागेवरच मंजुरी मिळेल.

यामुळे आसबेवाडी,शिवणगी,सोड्डी,सलगर खुर्द,लवंगी,सलगर बुद्रुक या भागातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
ह्या सरकारने रस्त्यासाठी भरपुर प्रमाणात निधी दिला आहे.
त्याची कामेही आज अंतीम टप्प्यात आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ज्या मुलभुत सुविधा आहेत यासाठी शंभर लाख कोटी रुपये या देशामध्ये पुढच्या पाच वर्षासाठी खर्च करावयाचा आहे असे जाहीर केले आहे.त्यामुळे देश विकासाच्या मार्गाने पुढे जात आहे.त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागातील कामे सुचवली आहेत.त्यासाठी पाठपुरावा करणे हे महत्वाचे आहे.यावेळी घरनिंकी,मारापुर,गुंजेगाव,तनाळी,तावशी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वातंत्र्यपुर्व काळातील ह्या रस्त्याचे काम आमदार प्रशांत परिचारक यांनी मार्गी लावल्यामुळे तेथील शेतक-यामधुन समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी हरीभाऊ यादव,राहुल शहा,अंकुश पडवळे,बाळासाहेब यादव आदीनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी अंकुश पडवळे,हरीभाऊ यादव,बाळासाहेब यादव,महादेव खांडेकर,बाळासाहेब चौगुले,युटोपीयन शुगरचे शेती अधिकारी धनंजय व्यवहारे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष ब्रह्मदेव वाघमारे,बसवराज मोगले,अॕड.धनंजय हजारे, घरनिंकीचे उपसरपंच अंकुश क्षिरसागर,पप्पू स्वामी,बबलु सुतार,रावसाहेब जुंदळे,विष्णू मासाळ,तायाप्पा गरंडे,तानाजी चौगुले,नानासो हेगडे,श्रीरंग क्षिरसागर,शिवाजी सरगर,दिगंबर भाकरे,सचिन बोडके,दादा काकेकर,शरद डोईफोडे,गणपत गांडूळे,दिलीप भुसे,नवनाथ आसबे,ज्ञानेश्वर गवळी,सिद्धेश्वर पाटील, बाबासाहेब भुसे, चाॕंदसो मुलाणी,बापू भुसे,ज्ञानेश्वर गरड,बालाजी गरड,अरुण इंगळे,सोमनाथ क्षिरसागर,नंदु गवळी आदीजन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुञसंचलन भारत मुढे यांनी केले तर आभार नवनाथ आसबे सर यांनी केले.














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा