मंगळवेढा मारापूर रस्त्याचे आ.परिचारकांच्या हस्ते आज भूमीपूजन व घरनिकी - गुंजेगाव रस्त्याचे लोकार्पण - Mangalwedha Times

Breaking

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढा मारापूर रस्त्याचे आ.परिचारकांच्या हस्ते आज भूमीपूजन व घरनिकी - गुंजेगाव रस्त्याचे लोकार्पण



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अतिशय दुर्लक्षित असलेल्या मंगळवेढा मारापूर या रस्त्याचे भाग्य अखेर उजाळले असून सदर रस्त्याचे भूमीपूजन आज रविवार दि.८ सप्टेंबर रोजी सकाळी १० . वाजता  रायगड फार्म हाऊस दावल मलिक , घरनिकी येथे आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मारापूरचे युवक नेते हरीभाऊ यादव यांनी दिली. 




सदर प्रसंगी घरनिकी - गुंजेगाव या रस्त्याचे लोकार्पणही आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असून यावेळी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन घरनिकी मारापूर , तावशी , गुंजेगाव व तनाळी येथील ग्रामस्थांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा