मंगळवेढ्यात भीमा नदीत बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढ्यात भीमा नदीत बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

गणपती विसर्जनाकरीता गेलेल्या ओंकार बापू मोरे (वय.२१ रा.बुरुडगली पंढरपूर) हा तरुण गणपतीचे विसर्जन सुरू असताना पाण्याचा अंदाज न आल्याने भीमा नदीच्या पाण्याचे वाहून गेला होता त्याचा मृत्यूदेह माचणूर ता .मंगळवेढा येथील बापु रामचंद्र पवार यांचे शेतजमिनीलगत भिमा नदी काठावर मिळून आला आहे.




याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत ओंकार बापू मोरे हा दिनांक १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या दरम्यान पंढरपूर येथील बुरुड गल्लीतील बालवीर गणेश उत्सव मंडळाचे गणपती विसर्जनाकरीता जुना दगडी पुलावर गेला होता. 

सध्या भिमा नदीपात्रामध्ये मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू असून दगडी पुलावर सुद्धा पाणी होते. त्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन सुरू असताना पाण्याचा अंदाज न आल्याने फिर्यादीचा भाऊ ओंकार हा पाण्याचे प्रवाहात वाहून गेला होता. 

मयत ओंकारचा शोध नातेवाईकांनी तसेच गणेश मंडळातील कार्यकत्यांनी त्याचा भिमा नदी पात्रात शोध घेतला पण तो मिळून आला नाही . सदरबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे. 

मंगळवेढा पोलीस असे त्याचा शोध घेत असताना त्याचे प्रेत माचणूर ता.मंगळवेढा गावचे शिवारातील बापु रामचंद्र पवार यांचे शेतजमिन गट नं . १२१ चे लगत भिमा नदी काठावर मिळून आला असल्याचे फिर्याद मयताचा भाऊ आकाश मोरे यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा