म्हैसाळ योजनेत मंगळवेढ्यातील पाच गावांचा समावेश : आ.प्रशांत परिचारक - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

म्हैसाळ योजनेत मंगळवेढ्यातील पाच गावांचा समावेश : आ.प्रशांत परिचारक



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील सहा गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळणार असून याला शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती विधानपरिषद आ.प्रशांत परिचारक यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.





यावेळी रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, शिवाजी नागणे,माजी सभापती शिवानंद पाटील रामकृष्ण नागणे, माजी नगरसेवक अरुण किल्लेदार, युन्नूस शेख आदीजन उपस्थित होते.

कृष्णा - कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हसाळ योजनेमध्ये मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी,शिवनगी,लवंगी,येळगी व सोडी या वंचित गावांचा समावेश होणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हसाळ उपसा सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अयोक व इतर कारणामुळे कमी होणारे क्षेत्राच्या बदल्यात प्रस्तावित क्षेत्राला पाणी देणे शक्य होणार असल्याने मंगळवेढा तालुक्यातील असबेवाडी , शिवनगी , लवंगी , येळगी व सोड्डी या गावांतील ७७४ हे . इतक क्षेत्र कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत शासनाची तत्वत : मान्यता देण्यात आल्याचे सांगितले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा