मारापुर मंडल अधिकाऱ्याचा मनमानी कारभाराची चौकशी करा;छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरज फुगारे यांची मागणी - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

मारापुर मंडल अधिकाऱ्याचा मनमानी कारभाराची चौकशी करा;छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरज फुगारे यांची मागणी


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील मंडल अधिकारी मनमानी कारभार करत असुन त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मारापुरचा मंडल अधिकारी हा गावातील गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून मनमानी कारभार करत आहे. गावातील शेतकरी, विद्यार्थी या मंडल अधिकार्‍यांकडे कामा निमित्त गेले असता त्याच्या कडुन पैशाची मागणी केली जाते. 

त्याच बरोबर त्याच्या कडुन आरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे त्या अधिकार्‍याची लवकरात लवकर चौकशी करून त्याच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल असे हि या निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी छावा संघटना तालुकाध्यक्ष सुरज फुगारे, येताळा खरबडे, सुरेश मरीआईवाले, नवनाथ मेटकरी, रणजित नागणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा