शिरनांदगी तलावा बरोबरच मंगळवेढ्याच्या इतर तलावांमध्येही पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील : शैला गोडसे - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

शिरनांदगी तलावा बरोबरच मंगळवेढ्याच्या इतर तलावांमध्येही पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील : शैला गोडसे


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख तसेच शिवसेनेच्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवार सौ शैला गोडसे यांनी आज शिरनांदगी आणि आणि आसपासच्या गावामध्ये सदिच्छा भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी शिरनांदगी तलावामध्ये शिवसेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनाला चर्चेमधून ग्रामस्थांकडून पुन्हा उजाळा मिळाला मी एक जिल्हा परिषद सदस्य असताना शेतकऱ्यांसाठी पाण्याचे आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.



परंतु जर मला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेने आपला आमदार म्हणून संधी दिली आणि मला ताकद मिळाली तर या शिरनांदगी तलावा बरोबरच मंगळवेढ्याच्या इतर तलावांमध्ये सुद्धा म्हैसाळ योजनेचे पाणी कशा पद्धतीने आणता येईल याच्यासाठी माझा लढा सुरू होईल असे उद्गार शैलाताई गोडसे यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले.

शैला गोडसे यांनी आज हुन्नुर, ममदाबाद. लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, मारोळी, शिरनांदगी इत्यादी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.

शैलाताई गोडसे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेनेच्या वतीने शिरनांदगी तलावामध्ये सहा दिवस जे ठिय्या आंदोलन झाले होते त्या ठिय्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे शैलाताई गोडसे यांच्यासारखे पाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले तर या परिसरामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावल्या शिवाय राहणार नाही असे मला वाटतेअसे मत शेतकरी सेना तालुकाप्रमुख शंकर भगरे यांनी व्यक्त केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा