मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व राजरत्न गणेशोत्सव मंडळ ही दोन मंडळे मिरवणूक सुरू असताना एकमेकांन समोरासमोर आल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यानी एकमेकांकडे बघून अंगविक्षेप करून डान्स केल्याने दोन मंडळात वादावादी होवून मारामारी करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी 12 जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,बोराळे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व राजरत्न गणेशोत्सव मंडळ यांच्या मिरवणूका एकमेकासमोर आल्या
असता दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यानी एकमेकांकडे बघून चिडवण्याच्या दृष्टीने अंगविक्षेप करून डान्स केल्याने वादाला तोंड फुटले.
दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यानी एकमेकांची गच्ची धरून जोरजोराने ओरडून मारामारी करून शांततेचा भंग केल्याने शत्रुघ्न लोहार,राहूल धनवे,धनाजी लोहार
भरत लोहार,सचि न नकाते,तोहसिब मुजावर,नानासाहेब भोजने,ओंकार धनवे,धनंजय गावकरे,बाळासाहेब चौगुले,
लोखंडे व शिर्के या 12 जणांविरूध्द पोलिस नाईक सुनिल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.अधिक तपास पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा