छावा संघटना वाहतूक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी नागेश नरोटे यांची निवड - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

छावा संघटना वाहतूक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी नागेश नरोटे यांची निवड


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अखिल भारतीय छावा संघटना वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष पदी नागेश नरोटे यांची निवड करण्यात आली. 

अ भा छावा छावा संघटना मंगळवेढा वाहतूक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी नागेश नरोटे याची निवड करण्यात आली यावेळी जिल्हाअध्यक्ष नागेशजी गायकवाड यांच्या हस्ते त्यांची निवड करण्यात आली.




यावेळी तालुकाध्यक्ष सुरज फुगारे विजय माळी, हणमंत घाडगे, अरुण मेटकरी, सोमनाथ वाकडे, दादा जाधव, सागर पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना नरोटे म्हणाले की अन्नासाहेब जावळे पाटील यांचे विचार तळागाळा पर्यंत पोचवून संघटनेची संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करीन व वाहतूकी संबधी वाहतुक धारांना येणाऱ्या प्रत्येक आडचणीचे निराकरण संघटनेच्या माध्यमातून करेन व सर्व सामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन असे ते म्हणाले यावेळी जिल्हा अध्यक्ष नागेश गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा