मंगळवेढ्यात 'पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात बाप्पांना निरोप - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढ्यात 'पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात बाप्पांना निरोप



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या', 'गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला' अशी साद घालत गुरुवारी (दि.१२) गणपती बाप्पांचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. कृष्ण तलाव ठिकाणी बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी झाली होती.




दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंत घरोघरी गणरायांचे पूजन केले जाते. घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांचे विसर्जन गुरुवारी करण्यात आले.मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागातदेखील बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. 

यावेळी ताशा आणि ढोल यांच्या वादनाने गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. गणेश विसर्जनादरम्यान संकलित होणाऱ्या निर्माल्यासाठी गणेश विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते तसेच तलावात पाण्याचे प्रदूषण होऊ नये, यासाठी कृत्रिम हौददेखील ठेवण्यात आले होते.

गणेश विसर्जनासाठी कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा