दामाजी शुगर्सचा असावनी प्रकल्पाचा आज भूमिपूजन समारंभ : समाधान आवताडे - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

दामाजी शुगर्सचा असावनी प्रकल्पाचा आज भूमिपूजन समारंभ : समाधान आवताडे



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रस्तावित केलेल्या असावनी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ ह-भ-प अॅड जयवंत बोधले महाराज यांच्या शुभहस्ते आज दि.१३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष समाधान आवताडे यांनी दिली.
             
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.एस.सी बॅंकेचे संचालक अविनाश महागावकर हे असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे उपस्थित राहणार आहेत यावेळी जकराया शुगर चे बीराप्पा जाधव,फेबटॅक शुगरचे भाऊसाहेब रुपनर भैरवनाथ शुगर चे कार्यकारी संचालक अनिल सावंत समाज कल्याण सभापती शीला शिवशरण सभापती प्रदीप खांडेकर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सोमनाथ आवताडे उपसभापती विमल पाटील जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण मंजुळा कोळेकर प्रेरणा मासाळ सूर्यकांत ढोणे येताळा भगत  दत्तात्रय जमदाडे नगरसेविका रतन पडवळे लक्ष्मी म्हेत्रे  रामचंद्र कोंडूभैरी अनिल बोदाडे विमल माने दामाजीचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी,कार्यकारी संचालक झुंजार आसबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

निवडणुकीपूर्वी अध्यक्ष समाधान आवताडे  सभासदांना जी आश्वासने दिली होती त्यामधील दहा रुपये प्रति किलो दराने साखर वाटप केली.एफ आर पी प्रमाणे दर दिला याशिवाय आसावनी प्रकल्पाचे कामाचे भुमिपुजन होत असल्याने आश्‍वासनाची मूर्तीकडे वाटचाल होत असल्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात तालुक्यातील काही बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहेत.त्यामुळे सभासदामधून समाधान व्यक्त केले जात आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा