मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात भाकरी पलटी करण्याची वेळ आलीय : समाधान आवताडे - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात भाकरी पलटी करण्याची वेळ आलीय : समाधान आवताडे



मंगळवेढा : समाधान फुगारे

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाच्या विकासासाठी भाकरी पलटी करण्याची खरी वेळ आली असल्याचे मत संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले ते आसवनी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.एस.सी बॅंकेचे संचालक अविनाश महागावकर हे होते तर ह.भ.प.अँड.जयवंत बोधले महाराज यांच्याहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.



यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे,जकराया शुगरचे बीराप्पा जाधव,फेबटॅक शुगरचे भाऊसाहेब रुपनर,समाज कल्याण सभापती शीला शिवशरण,सभापती प्रदीप खांडेकर,खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,उपसभापती विमल पाटील,जिल्हा परिषद सदस्य दिलीप चव्हाण,मंजुळा कोळेकर,प्रेरणा मासाळ, सूर्यकांत ढोणे,प्रा.येताळा भगत,नगरसेविका निर्मला माने,रतन पडवळे,लक्ष्मी म्हेत्रे,रामचंद्र कोंडूभैरी,अनिल बोदाडे,विमल माने,नारायण गोवे,दामाजीचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी,कार्यकारी संचालक झुंजार आसबे आदी मान्यवर उपस्थित होते.

आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,कै.मारवाडी वकील व कै.शहा शेडजी यांनी हा कारखाना उभा केला आहे.ते पाहत असतील असा सोहळा व काम आम्ही केले आहे.साखर उद्योग प्रचंड अडचणीचा उद्योग आहे.फक्त साखरेवर उद्योग चालविणे अवघड होत आहे.अनेक अडचणी येत होत्या मात्र केंद्र सरकारने एक योजना निर्माण करून हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे.पहिल्या व दुसऱ्या यादीत नाव आले नाही नितीन गडकरी,सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून तिसऱ्या यादीत नाव येऊन आज या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.

मंगळवेढा ही संतांची भूमी असून या प्रकल्पाचे उद्घाटन बोधले महाराजाच्या हस्ते करून संतांची परंपरा जोपासली.हा प्रकल्प इथिनॉल निर्माण करण्यासाठी उभा केला आहे.४५ हजार लिटर क्षमतेची हा प्रकल्प आहे.येणाऱ्या एका वर्षामध्ये प्रकल्प सुरवात करण्यात येईल.

पाठीमागील संचालक मंडळाने हा प्रकल्प बी.ओ.टी तत्वावर देण्याचा घाट घातला होता. मात्र आम्ही याला कडाडून विरोध केला आणि त्यांचा डाव हाणून पाडला होता म्हणून आज हा प्रकल्प ५७ कोटी ४० लाखात झाला आहे. येत्या सहा माहिनायत सर्व मान्यता प्राप्त करून शुभारंभ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

राजकारनात आज किती जणांनी आश्वासने दिली आहेत. या मतदारसंघात अनेक प्रश्न अपुरे आहेत.रस्ते,धूळ,पिण्याचे,पाणी,गटारी व नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रलंबित आहेत.लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेमुळे पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील मोठा हा पाणी प्रश्न असून हा पाणी प्रश्न मी लहान पनापासून ऐकत आहे.पण अद्यापही कोणीही हा प्रश्न सोडवला नाही.आम्हाला नुसते बोलणे नको काम पाहिजे पण यांचे प्रयत्न अजून सुरू आहेत.मी जे बोलतो ते नक्कीच करून दाखवतो.या मतदारसंघात सर्वात मोठा भीषण प्रश्न बेरोजगार युवकांचा आहे.मला संधी द्या मी हा प्रश्न नक्कीच सोडवून दाखवेल असे आव्हान त्यांनी यावेळी केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा