राष्ट्रभाषा दिनी म.सा.प.चे हिंदी कवीसंमेलन - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

राष्ट्रभाषा दिनी म.सा.प.चे हिंदी कवीसंमेलन



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर यांनी दै.दामाजी एक्सप्रेसच्या सहयोगाने शनिवार दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त सायं.6.30 वाजता हिंदी काव्यसंमेलनाचे आयोजन केले आहे. 

संगीता मासाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कविसंमेलनात रवी सोनार, राकेश गायकवाड, गोरक्ष जाधव, दया वाकडे, सुषमा सुतार, रेश्मा गुंगे, हिना शेख, सौरभ पाटील, विश्रांती ढावरे व अपर्णा मंडले हे हिंदी कवितांचे सादरीकरण करणार आहेत. 

हिंदी भाषा प्रेमींनी या कविसंमेलनास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन म.सा.प.दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे व दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा