मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार भारत भालके यांनी २० व्या फेरीपर्यंत जवळपास १०हजार मतांची आघाडी घेतली आहे त्यामुळे त्यांची 'हॅट्रिक'च्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
भाजप उमेदवार सुधाकरपंत परिचारक व अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना पंढरपूर शहर व २२ गावातून मताधिक्य मिळवता आले नाही त्यामुळे तेथून आमदार भारत भालके यांनी ५ हजार मतांची आघाडी घेतली होती.
आमदार भारत भालके यांना मंगळवेढा तालुक्यातून ही मतदारांनी आघाडी मिळवून दिली असून ते 'हॅट्रिक'च्या दिशेने वाटचाल करीत असून येत्या ३० मिनिटात अधिकृत घोषणा केली जाईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा