मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अखिल भारतीय वारकरी मंडळ,मंगळवेढा शहर व तालुका यांचेवतीने आज मंगळवार दि.26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वा.श्री संत दामाजी मंदिरामध्ये भव्य वारकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती अ.भा.वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष ह.भ.प. निलेश गुजरे व शहराध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर(माऊली) भगरे यांनी दिली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांच्या प्रेरणेने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर वारकरी मेळाव्यास अ.भा. वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून श्री संत दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
यावेळी ह.भ.प. तात्यासाहेब(बुवा)जगताप महाराज,अकोल्याचे ह.भ.प. राजाराम कदम महाराज,मंगळवेढयाचे ह.भ.प. बजरंग माळी महाराज,चिक्कलगी -भुयारचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम महाराज, संगीत विशारद ह.भ.प.सिध्देश्वर कोळी, भालेवाडीचे ह.भ.प. भागवत गवळी महाराज, मारापूरचे ह.भ.प. पांडुरंग माने महाराज,बठाणचे ह.भ.प. शिवाजी घोडके तसेच वारी परिवाराचे ह.भ.प. प्रा. विनायक कलुबर्मे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.सदरच्या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अ.भा.वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी व वारकरी बांधव परिश्रम घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा