मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी येथील योगेश एकनाथ घोडके या २० वर्षीय तरुणाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पंढरपूर येथे घडली होती.परंतु योगेश घोडके यास कोणताही घातपात झाला नसून त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार पोलीस तपासातून पुढे आला आहे.प्रेमसंबंधात विफल होऊन त्याने आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे युवक वर्गात खळबळ उडाली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
पंढरपूर येथील श्री हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या योगेश घोडके राहणार मुंढेवाडी तालुका मंगळवेढा या युवकाचा येथील जुना कराड नाका येथील आपल्या राहत्या खोलीमध्ये मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली होती .
आपल्या खोलीमध्ये निपचित पडलेल्या योगेश याच्या गळ्यावर वण आढळून आले होते.यामुळे ही घटना घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.परंतु पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि योगेश यास घातपात झाला नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश याचे एका तरुणीशी प्रेम संबंध होते.हे संबंध काही दिवसांपासून तूटले होते.याच तरुणीशी दुसऱ्या तरुणाचे प्रेमसंबंध जुळल्याची माहिती योगेश यास होती.या घटनेमुळे योगेश घोडके हा पुरता विफल झाला होता.गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी डॉक्टर मासाळ यांच्या श्री हॉस्पिटल मधून आपले काम संपवून योगेश त्याच्या राहत्या खोली मध्ये आला आणि दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान त्याने आपला गळा आवळून आपली जीवनयात्रा संपवली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा