सदाबहार गायक महेंद्र कपुर यांच्या 86 व्या जयंती निमित्त स्व.संजय-सविता स्मृती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुरसंग्रम प्रस्तुत महेंद्र की नगमे या हिंदी, मराठी गाण्यांच्या ट्रॅक शो ने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
या कार्यक्रमाचे उदघाटन धनश्री महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रा.शोभा काळुंगे यांच्या हस्ते व बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या कार्यक्रमात सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, नवनाथ सावळे, संतोष ढावरे, सुदर्शन फुगारे, यांनी सुर तेची छेडिता, मेरे देश की धरती, तुम अगर साथ देने का, सजनी ग भुललो मी, नीले गगन के तले, मेरा प्यार वो है के, हे चिंचेचे झाड, ऐ जाने चमन, जिसके सपने हमें आते रहे, दिल की ए आरजू थी कोई, तुम्हारा चाहनेवाला, अकेला चल चला चल अशी एकापेक्षा एक सरसगीते सादर करून वाहवा मिळवली. या कार्यक्रमात कु.पिया शाकीर सय्यद या चिमुकलीनेही उत्स्फुर्तपणेही गीत सादर केले.
सदर कार्यक्रमात म.सा.प.शाखा दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे यांना कै.बाबुरावजी डिसले स्मृती जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशपाक काझी यांनी केले तर प्रास्तविक व आभार प्रदर्शन स्व.संजय-सविता सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमास प्रा.शिवाजीराव काळुंगे, भारत मासाळ, अॅड.रमेश जोशी, तात्यासाहेब चव्हाण, लहू ढगे, पांडुरंग काळे, अॅड.विलास देशमुख, महादेव जिरगे, दादासाहेब घाडगे, महादेव माने, शंकर आवताडे, पिंटू माने, विनायक चव्हाण, मनोहर हजारे, मोहन गांडुळे, संतोष येणपे, बाबुराव माळी, प्रतिक भगरे, बबन चव्हाण, गणेश शिकतोडे, अनिल गायकवाड, प्रकाश आवताडे, रेखा जडे, अश्विनी किल्लेदार, सुषमा सुतार, दया वाकडे, मिनाक्षी शिंदे, नवगीरे व इतर अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल प्रतिभा गायकवाड, संतोष गायकवाड, शंकर धुमाळ, सविता गोवे, लता आवताडे, सुरेश पांचाळ व के.एन.ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा