खा.संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजपाचे मंगळवेढ्यात जोडे मारो आंदोलन - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

खा.संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजपाचे मंगळवेढ्यात जोडे मारो आंदोलन



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवार दि.15 जानेवारी रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला.त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. 

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी खा.राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. 


शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असे वादग्रस्त वक्तव्य खा.राऊत यांनी केले होते. त्यामुळे त्याचे पडसाद मंगळवेढामध्येही उमटले. रात्री ७ वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,शशिकांत चव्हाण,तालुकाध्यक्ष संतोष मोगले,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,भाजपाचे राजेंद्र सुरवसे, विजय बुरकुल, प्रतीक किल्लेदार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चोखामेळा चौकाच्या आवारात एकत्र आले. यावेळी कार्यकर्त्यांनी खा.राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा