पोलिस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस प्रशासनात मोठी खळबळ - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

पोलिस कोठडीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस प्रशासनात मोठी खळबळ




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या तुंगत येथील आरोपीने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

अर्जून दिगंबर शितोळे अस आत्महत्या करणार्या संशयित आरोपीचे नाव आहे . या धक्कादायक प्रकारानंतर पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे . 


आरोपीची प्रकृती गंभीर आहे . आलीकडेच संशियीत आरोपीने तुंगत गावातील एका मतीमंद महिलेवर अत्याचार केला होता . या प्रकरणी आरोपी तो पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील जेल मध्ये होता . 

दरम्यान आज पहाटे आरोपी शितोळे याने कोडठीतच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . तात्काळ त्याला पंढरपुरातील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .घटने नंतर जिल्हा पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे , उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे यांनी रूग्णालयाला भेट देऊन आरोपीच्या प्रकृतीची चौकशी केली .









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा