आयुष्यात अनेक कठिण प्रसंग आले तरी आपले स्वप्न,ध्येय सोडायचे नसते. कोणालाही गोष्टीचा नकारात्मक परिणाम आपल्या ध्येयावर होता कामा नये अशी शिकवण बाल वयातच शिवरायांना आऊसाहेब जिजाऊंनी दिली. आपल्या संस्कारातून एक एक मोती शिवव्यक्तिमत्वात विणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवरायांना तयार करणारी स्वराज्यमाता जिजाऊ ह्या शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देतात असे मत शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
लक्ष्य करिअर अॕकॕडमी ललगुण या ठिकाणी राजमाता जिजामाता जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रा. शंकरराव खापे, शिंदेसरकार प्रतिष्ठाणचे संदिप शिंदे यांच्यासह भावी सैनिक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी म्हणाले शिवरायांनी आपल्आईचे स्वप्न पूर्ण केले हि गोष्टी साधी नाही. येणाऱ्या काळात जर यश संपादन कराचे आसेल तर मातृभक्त शिवराय आपल्या काळजात साठवणे हि काळाजी गरज. नुसते स्वप्न पाहून ते पूर्ण होत नसते त्यासाठी जिजाऊंनी आपल्या लेकाला म्हणजेच बाल शिवरायांना स्वराज्याची ध्येय प्रतिज्ञा घ्यायला लावली. आपणही आपल्या ध्येयाची प्रतिज्ञा घेतल्यास आपणास यश लवकरच आत्मसात करता येईल असे विशाल सुर्यवंशी म्हणाले.
यावेळी प्रा. विशाल सुर्यवंशी यांनी सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ध्येय प्रतिज्ञा दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा