धक्कादायक : सोलापूरात मुलांनीच केला वडिलांचा खून! - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

धक्कादायक : सोलापूरात मुलांनीच केला वडिलांचा खून!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सोलापूर परिसरातील खुनाचा मंद्रूप पोलिसांनी 72 तासात उलगडा केला आहे. दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलांनीच कुऱ्हाड आणि विळ्याने वार करून खून केला आणि त्यानंतर मृतदेह नदीपात्रात टाकून दिला होता. या गुन्ह्यात पत्नीसह मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे.

नदीपात्रात आढळला होता मृतदेह

दत्तात्रय सिद्धाराम चौगुले (वय 50, रा. वळसंग ता. दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात दत्तात्रय चौगुलेची पत्नी सुनीता चौगुले (वय 45), मुलगा आतिष (वय 23) व अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

पत्नी सुनीता आणि मुलगा आतिष या दोघांची चार दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 9 जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास भंडारकवठे गावाच्या परिसरात भीमा नदीवरील पुलाजवळ नदी पात्रामध्ये चौगुले याचा मृतदेह आढळून आला होता. पोलिस पाटील अशोक बसवंत मुक्काणे (वय 45, रा. भंडारकवठे, सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती. मृताची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो आणि माहिती पोलिसांनी दक्षिण सोलापूर आणि इंडी तालुक्‍यातील विविध व्हॉट्‌स ऍप ग्रुपमध्ये मराठी आणि कन्नड भाषेत फॉरवर्ड केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा