
मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांची बदली पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे झाली आहे.नव्याने आलेले पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी शनिवारी सायंकाळी पदभार स्विकारला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके,जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी केलेल्या वार्षिक तपासणीमध्ये मंगळवेढा पोलिस स्टेशनकडे जिल्हयात सर्वाधिक प्रलंबीत गुन्हे असल्याचे सकृतदर्शनी आढळले होते.पोलिस निरिक्षक गाडे हे दि.31 मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र तत्पुर्वीच त्यांची बदली झाली आहे.त्यांच्या कालावधीत गुन्हे निर्गती पुर्णपणे होवू शकली नसल्याचा ठपका वरिष्ठांकडून ठेवण्यात आला आहे.
दरम्यान या कालावधीत गुन्हे पेंडींग ठेवल्याबाबत पोलिस नाईक राहुल देवकते यास कारागृहात जाण्याची वेळ आली तर पोलिस हवालदार जराचंद काळेल याला निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागले.पोलिस अधिकारी या नात्याने सर्व कर्मचार्यांना समान वागणूक देणे अपेक्षित असताना एकाच कर्मचार्याला हाताशी धरल्याने कर्मचारी वर्गात दबक्या आवाजात असंतोष निर्माण झाला होता.
झिरो कर्मचार्याबाबत पोलिस निरिक्षकांना प्रसार माध्यमांनी विचारले असता वरिष्ठांसमोर पोलिस स्टेशनमधील फायली ठेवण्यासाठी ठेवल्याचे संागण्यात आले होते.मात्र पोलिस स्टेशनमध्ये गोपनीय कागदपत्रे असताना खाजगी माणसाच्या हातात त्या फायली देणे कायदयाला धरून आहे का? असा प्रश्न या मुद्दयावरून उपस्थित होत असून ज्यांनी झिरो ठेवले त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलिस निरिक्षक गाडे यांना शनिवारी सायंकाळी 4.00 वा. कार्यमुक्त करण्यात येवून नव्याने हजर झालेले पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी कार्यभार स्विकारला.ते मुळचे फलटणचे असून ते 1995 साली एम.पी.एस.सी.मार्फत घेतलेल्या परिक्षेत पोलिस निरिक्षकपदी उत्तीर्ण झाले.त्यांनी भिवंडी,कल्याण,पुणे ग्रामीण,भंडारा,सातारा येथे आत्तापर्यंत सेवा बजावली आहे.सोलापूर ग्रामीण कंट्रोल येथे दि.14 नोव्हेंबर रोजी ते हजर झाले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना गुंजवटे म्हणाले,पोलिस स्टेशन झिरोमुक्त केले जाईल,नागरिकांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेवून त्यांना योग्य पध्दतीने न्याय दिला जाईल.तसेच अवैध धंदयाबाबत निर्भयपणे नागरिकांनी वस्तुस्थितीदर्शक माझेकडे तक्रारी कराव्यात त्याच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा