राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे नेते संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजय दौंड हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
तर दुसरीकडे, भाजपतर्फे राजन तेली उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध न होता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होणार आहे. येत्या 24 जानेवारीला विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.दरम्यान संजय दौंड माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत.
विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. महाराष्ट्र विकास आघाडीकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दौंड यांचा विजयाचा मार्ग सोपा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा