मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्यावतीने गरजूंना ब्लँकेटचे वाटप - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्यावतीने गरजूंना ब्लँकेटचे वाटप



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.15 जानेवारी दामाजी मंदिरात गोरगरीब व गरजूंना थंडीपासून बचाव करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

व्यासपीठावर पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे, अध्यक्ष मोहन माळी, माजी अध्यक्ष शिवाजीराव पुजारी, सत्कारमुर्ती अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी, धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक शरद कोळी आदि उपस्थित होते.

यावेळी पत्रकार तानाजी चौगुले यांनी प्रास्तविक, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब सासणे, शिवाजी केंगार, प्रमोद बिनवडे, अ‍ॅड.जावेद मुल्ला, अ‍ॅड.विकास माळी, आनंदराव जावळे, पत्रकार समाधान फुगारे, सुनिल कसबे, दादा लवटे, प्रसाद कसबे, नवनाथ देशमुखे, अक्षय पवार, प्रथमेश तोडकरी यांचेसह धनाजी देवकर, दिलीप उगाडे, पिंटू माने, नागेश डोंगरे, संजय माळी, विजय जाधव, जमीर सुतार, संजय जगताप, प्रभाकर नागणे  आदि उपस्थित होते.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा