सोलापूर, 16 जानेवारी (हिं.स)- बॅँक ऑफ महाराष्ट्र' या राष्ट्रीयीकृत बॅँकेच्या वतीने कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी कर्ज वाटपासाठी पंढरपूर येथील अकलूज रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती गेटजवळ शुक्रवारी (१७ जानेवारी) एक कृषि महामेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
या मेळाव्यात सोलापूर विभागातील सर्व शाखा सहभागी होणार आहेत. सर्व कृषि विषयक गरजा जसे फळबाग लागवड, शीतगृह, अन्न प्रक्रिया उद्योग, पॅक हाऊस, शेतीशी निगडीत वाहन तसेच औजारे खरेदी, सूक्ष्म सिंचन (पाणी पुरवठा योजना) तसेच शेतीशी निगडीत विविध प्रकारच्या कृषि कर्जाच्या अर्जावर विचार करून अर्जदारांना कागदपत्रे छाननीनंतर त्यांना कागदपत्रे योग्य व पूर्ण असल्यास तात्काळ मंजुरी व वाटपही केले जाईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा