मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा येथील श्री विद्या विकास मंडळ संचलित, संत दामाजी महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ,सामाजिक वनीकरण सोलापुर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर आणि श्री संत दामाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
जाहिरातीसाठी संपर्क:-7588214814
प्रथम क्रमांक पारितोषिक रु५००० दहिहंडे गजानन शिरीष(श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी ) द्वितीय पारितोषिक रु ३००० विभागून कवठेकर सेजल संतोष (सांगोला महाविद्यालय सांगोला )व पाटील मोनाली किशोर( श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा)तृतीय पारितोषिक रु २००० वाघमारे मयुरी अनिल ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर) चौथे उत्तेजनार्थ पारितोषिक रु ५०० साळवे नागनाथ संपत (शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलूज)या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मंदिरे समितीचे ह-भ-प शिवाजीराव मोरे महाराज, संस्था समन्वयक राहुल शहा, प्राचार्य डॉ.एन बी. पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
या परीक्षेचे परीक्षक म्हणून सुनील नष्टे प्रा.विश्वनाथ ढेपे यांनी काम पाहिले. यावेळी नगरसेवक नवनाथ रानगट (पंढरपूर) लिविंग ऑफ आर्टचे डॉ.अनिल नारायणपेठकर ,स्वप्नील पेकम, अंबिका येमूल, तरुण भारतचे उपसंपादक संकेत कुलकर्णी ,मंदिर व्यवस्थापन समितीचे बालाजी पुदलवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा .गुणवंत सरवदे( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर) हे
उद्घाटन सत्रात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा विनायक कलुर्बमे यांनी केले. प्रा. राजकुमार पवार,प्रा.धनाजी गवळी प्रा.दत्ता सरगर यांनी या स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा