मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यभरातील समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू संत बाळू मामा यांच्या अदमापूर या तीर्थ क्षेत्रातील मानाच्या आश्वाचे व मेंढरांच्या कळपाचे हुलजंती ता.मंगळवेढा येथे भाविकाणी जोरदार स्वागत केले.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मकर संक्रांतीचे औचित्य साधून हुलजंती येथील धनगर समाजाचे ग्रामदैवत महालिंगराय देवस्थान येथे संत बाळूमामाच्या मानाच्या आश्वाचे व मेंढरांच्या कळपाचे व त्यांच्यासोबत आलेल्या पुजाऱ्यांचा भावपूर्ण सत्कार व पूजा करण्यात आली
.त्यानंतर रात्री मारुती पेटरगे यांच्या शेतात आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.संत बाळु मामाच्या अदमापूर या गावातील मेंढरांचे कळप शेतात बसविणे हे शुभ मानले जाते.मानाचे अश्व व मेंढरे गावात आल्यानंतर आपल्याच शेतात मुक्कामी बसावी यासाठी भाविकांची चढाओढ असते.दरम्यान हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी माजी सरपंच मधुकर गंगामाई,शामराव गंगामाई,मारुती पेटरगे, तुकाराम येड्डे,शिवाप्पा कोठे,बिराप्पा कोरे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा