शिक्रापुर येथे पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

शिक्रापुर येथे पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा खून

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पत्नीचे प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध उघड झाल्याने चिडून जाऊन पतीने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याचा प्रकार बुधवारी शिक्रापुर येथे घडला. खून झालेल्या इसमाचे नाव मोईन दिलावर खान ( रा.वाकत ता.रिसोड जि.वाशिम ) असे नाव आहे. आयुब सिकंदर शेख (राहणार वाकत ता. रिसोड जिल्हा वाशिम ) याच्यावर खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घरमालक कैलास मारुती बनसोडे यांनी फिर्याद दिली असुन शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुब शेख याच्या पत्नीने पंधरा दिवसांपूर्वी कैलास बनसोडे यांच्या पाबळ चौकातील चाळीत खोली भाड्याने घेतली होती.

आयूब शेख हा त्याच्या पत्नीसोबत राहत नव्हता. त्याची पत्नी तीन मुलांसह एकटीच राहत होती. ती मोलमजुरी करत होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास बनसोडे याना त्यांच्या मुलीचा फोन आला की एका खोलीत दोन इसम जोरात भांडत असुन एकाने दुसऱ्याच्या डोक्यात हातोडीनी मारहाण केल्याचे सांगितले.

बनसोडे घटना स्थळावर पोहचले असता आरोपी आयुब सिकंदर शेख यांने सांगितले की सदर विवाहिता ही त्याची पत्नी असुन पत्नीचे आणि मयत मोईन यांचे अनैतिक संबंध प्रत्यक्ष पाहिल्याने चिडुन जाऊन हातोडीने डोक्यात मारल्याचे सांगीतले. बनसोडे यांनी आरोपी आयुब शेखला कोंडून घेतले. दरम्यान मोईन दिलावर खान याचा उपचारां दरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. बी. राणगट करत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा