मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यांपैकी 161 कोटी 37 लाख रुपयांचे वाटप झाले असून ते पैसे शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दोन महिन्यांत चक्री वादळ, अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने जिराईत जमिनीसाठी प्रति हेक्टर आठ हजार, तर बागायत क्षेत्रासाठी 16 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.
त्यासाठी शासनाने 181 कोटी रुपये दोन टप्प्यांत सोलापूर जिल्ह्याला दिले होेते. ते पैसे थेट शेतकर्यांच्या खात्यांत जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या होत्या.त्यामुळे तहसीलदारांनी तलाठी पोलिस पाटील आणि कोतवालामार्फत शेतकर्यांच्या बँक खात्यांची माहिती घेऊन त्यांच्या खात्यांवर पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अद्याप काही शेतकर्यांच्या खात्यांवर पैसे जमा झाले नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या होत्या.
त्यावर सर्वच तालुक्यांचा आढावा घेऊन प्रांताधिकार्यांनी अहवाल सादर केला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी गावातील शेतकरी बाहेरगावी राहत असल्याने त्यांचा थांगपत्ता लागत नाही, अनेक ठिकाणी बँक खाती मिळू शकली नाहीत. या कारणांमुळे जवळपास सर्वच तालुक्यांत 80 ते 90 टक्के वाटप झाले असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळेही शेती पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याठिकाणी अतिवृष्टीची नुकसानभरपाई द्यायची की महापुराची द्यायची, असा सवाल तहसीलदारांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास 14 गावांतील निधी वाटप स्थगित केला असून त्याठिकाणी शेतकर्यांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा