मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ग्रामपंचायत दामाजी नगर व चौखामेळानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा यांच्या सहकार्याने दर गुरुवारी सुरू करण्यात आलेल्या आठवडे बाजाराचे उद्घघाटन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या हस्ते बाजार समितीच्या आवारामध्ये करण्यात आले.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना चेअरमन समाधान आवताडे म्हणाले की,शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या हितासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय हितकारक असून यापुढे नागरिकांना आठवड्यातील दोन दिवस स्वच्छ व ताजा भाजीपाला व अन्य वस्तू मिळणार आहेत.यामध्ये योग्य प्रकारच्या सोयीसुविधा यांचा पुरवठा दोन्ही संस्थांनी करावा बाजार समितीने बेदाणा सौदे लिलाव व जनावर बाजार सुरू करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सदरचा कार्यक्रम साठी दामाजी शुगर चे संचालक संजय पवार, लक्ष्मण जगताप , सचिन शिवशरण नगरसेवक अनिल बोदाडे, युवक नेते युवराज शिंदे, मंगळवेढा बार आसोशिएशनचे अध्यक्ष अँड.धनंजय जाधव,पांडुरंग गाढवे,मिस्टर सभापती सुधाकर मासाळ बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, शंभूदेव कदम ,सोपान चव्हाण सर ,जमीर सुतार, संजय जगताप ,दिलीप उघाडे, आप्पा वडतिले ,बसवेश्वर माळी, संजय माळी ,बापु डोंगरे, प्रभाकर नागणे ,विजय जाधव ,दिलीप वाडेकर ,सतीश मोहिते, बंडू जाधव ,सागर माने, राजेंद्र लेंडवे ,पांडुरंग नकाते ,दत्तात्रय सरगर, हिरालाल तांबोळी, अमित गवळी, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश जुधंळे, संचालक दत्तात्रय गायकवाड, तज्ञ संचालक सत्यजित सुरवसे ,सचिव सचिन देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक ग्रामपंचायत दामाजीनगरचे सरपंच अँड दत्तात्रय तोडकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी भोरकडे साहेब यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा