मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील एसटी स्टँड महाविद्यालय परिसर शहरातील मुख्य मार्गावरून टवाळखोरपणा करीत फिरणाऱ्या अकरा रोडरोमियो वर निर्भया पथक मुंबई पोलीस अॅक्ट प्रमाणे कारवाई केली.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
शहरातील एसटी स्टँड परिसरात शाळा महाविद्यालय भरण्यापूर्वी व सुटल्यानंतर मुलामुलींची गर्दी असते यावेळी टवाळखोर मुले दामाजी चौकातून भटकत असल्याची माहिती डी.वाय.एस.पी दत्तात्रय पाटील यांना मिळताच त्यांनी दामिनी पथकाला सूचना दिल्याने पथकाने दामाजी महाविद्यालय परिसरात टवाळखोर पणा करत फिरणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन कॉलेजमध्ये येण्याबाबत त्यांच्याकडे विचारपूस करून ओळखपत्राची मागणी केली असता काहीजणांचा त्या कॉलेजचा शाळेचा संबंध नसताना भटकत असल्याचे निदर्शनास आले.
संबंधितांना पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. त्याचबरोबर बस स्थानक, मंगळवेढा शहरातील मुख्य रस्ते या मार्गावरून निर्भय पथकाने अन्य रोडरोमियांनाही ताब्यात घेतले. बऱ्याच दिवसानंतर फिरून आज कारवाई केल्याने यांचे चांगलेच धाबे दणाणले निर्भया पथकाने अधून-मधून कारवाईचे सातत्य ठेवल्यास रोड मिळाला निश्चित चाप बसेल अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत
मोकाट रोडरोमियोंना ताब्यात घेतले. या निर्णय पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक बामणी पोलीस शिपाई महासिद्ध कोळी महिला पोलीस सावंत व रसाळ यांचा समावेश होता. 11 रोड रोडरोमियावर मुंबई पोलीस अॅक्ट व 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा