मंगळवेढेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सोमवारपासून 'बंद'च्या अफवे बाबत प्रशासनाने केला खुलासा - Mangalwedha Times

Breaking

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

मंगळवेढेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सोमवारपासून 'बंद'च्या अफवे बाबत प्रशासनाने केला खुलासा

 


मंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा शहरात लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असणारे मेसेजेस चुकीचे आहेत. लॉकडाऊन केला जाणार नसून नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


मंगळवेढा शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार, अशा आशयाचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत प्रशासनाने खुलासा केला आहे की, हे मेसेजेस पूर्णपणे चुकीचे असून मंगळवेढा शहरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोणीही घेतला नाही.त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गोंधळून जाऊ नये.









लॉकडाऊन जाहीर करण्याचे चुकीचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉरवर्ड करू नयेत. अशा प्रकारचे चुकीचे आणि जनतेची दिशाभूल करणारे मेसेज सोशल मीडियावरून फॉरवर्ड करणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जाईल.


प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत दवाखान्यात जावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


सोमवार पासून मंगळवेढा शहर बंद नाही


सध्या मंगळवेढा शहरात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू असून दि.22 सप्टेंबर नंतर नगरपालिका प्रशासन अधिकृत निर्णय घेऊनच वेळ वाढवून देण्याबाबत आदेश देईल.सोमवार पासून मंगळवेढा शहर बंद नाही.


दि.6 सप्टेंबर रोजी घेतलेला जनता कर्फ्यू निर्णय दि.22 सप्टेंबर पर्यंत कायम आहे.या मध्ये सध्या तरी कोणता बदल नाही. सोमवारी भरणारा आठवडा बाजार बंद आहे.भाजी पाला व फळे विक्री मंगळवार ते रविवार आहे. बाकी इतर सर्व दुकाने दररोज उघडे राहतील.  सर्वांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा