टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजवला असून आज आणखीन 51 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण बाधितांची संख्या 789 वर गेली आहे.
आज दि.10 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 931 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 931 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह - 43 आणि निगेटिव्ह - 888 जणांचे अहवाल आलेले आहेत . सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 5 , लक्ष्मीदहीवडी 8 , पाटखळ 2 , महमदाबाद ( शे . ) -1 , हिवरगाव 3 , मरवडे 1 , शिरसी 6 , माचणूर 2 , ब्रम्हपूरी 5 , अरळी-2 , दामाजीनगर -8 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT - PCR ) चे 08 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदरचे नागरीक हे मौजे मंगळवेढा शहर 2 , रड्डे-3 , खुपसंगी 2 , गणेशवाडी 1 येथील रुग्णाच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 789 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 359 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत 414 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा