टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात आज पुन्हा 31 नव्या रुग्णांची वाढ झाली असून एकूण बाधितांची संख्या 892 वर गेली आहे.
आज दि.14 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 333 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 333 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 31 आणि निगेटिव्ह 302 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक मौजे मंगळवेढा शहर 5 , दामाजीनगर 11 , चोखामेळानगर 3 , मारोळी 2 , लवंगी 1 , सलगर बु . 5 , रड्डे 1 , मुढवी 1 , शेलेवाडी 1 , नंदूर 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT - PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 892 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 395 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 480 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
सांगोला तालुक्यात आज 78 कोरोना रुग्णांची वाढ
सांगोला शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात आज पुन्हा मोठी वाढ झाली असुन 78 रुग्णांची वाढ झाली असल्यामुळे एकूण बाधितांची संख्या 1 हजार 197 वर गेली आहे.
आज दि.14 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 451 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 451 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 78 आणि निगेटिव्ह 373 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरीक मौजे सांगोला 21 , मांजरी 1 , वाणिचिंचाळे 1 , मेडशिंगी 1 , राजापूर 1 , य.मंगेवाडी 6 , आलेगांव 1 , कोळा 1 , अकोला 1 , वाढेगांव 2 , देवळे 1 , चिणके 1 , नाझरे 1 , वाकी ( शि .) 2 , महुद 17 , राजुरी 3 , डिकसळ 1 , पारे 4 , जवळा -10 , पाचेगांव खु . 2 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT - PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 197 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 503 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 682 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा