माजी आ.गणपतराव देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह; कार्यकर्त्यांनी सोडला सुटकेचा निश्वास - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

माजी आ.गणपतराव देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह; कार्यकर्त्यांनी सोडला सुटकेचा निश्वास

 







मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । माजी मंत्री तथा शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे स्विय्य सहाय्यक व वाहन चालक हे दोघे कोरोनाबाधित निष्पन्न झाल्यानंतर सांगोला शहरासह तालुक्यात खळबळ उडाली होती. ( Ex MLA  Ganapatrao Deshmukh's corona test negative )


खबरदारीचा उपाय म्हणून माजी आमदार गणपतराव देशमुख यांची तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली असून ही तालुक्यासाठी गुड न्यूज ठरली आहे.


दरम्यान, आता १५ दिवस कुणीही माजी आमदार गणपतराव देशमुख यांना भेटू नये असे आवाहन करण्यात आले असून आता आपल्या नेत्याची काळजी कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पी.ए. व चालक हे दोघे कोरोनाबाधित झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घालमेल वाढली होती.मात्र आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.


आबासाहेबांच्या विक्रमाची इतिहासात नोंद


विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून अपवाद वगळता ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळविला आहे.


२०० ९च्या निवडणुकीत विजय मिळवून , करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी अर्थात आबासाहेबांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

२०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता. गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा , अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. ( Think tank live)





Sangola Ex MLA Ganapatrao Deshmukh's corona test negative

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा