कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी 'या' राज्यात आजपासून जमाव बंदी 144 कलम लागू - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी 'या' राज्यात आजपासून जमाव बंदी 144 कलम लागू

 





टीम मंगळवेढा टाईम्स । दक्षिण भारतात केरळमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केरळमध्ये रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरली आहे. या आठवड्यात केरळने रुग्ण संख्येत टॉप तीन मध्ये उसळी घेतली आहे. त्यामुळेच राज्य सरकारसाठी रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरली आहे.





मुळात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला होता. त्यानंतर कोरोनाची रुग्ण संख्या केरळमध्ये वाढत गेली होती. राज्य सरकारने विविध उपाययोजना करून रुग्ण संख्या आटोक्यात आणली होती. कोरोनाच्या केरळ मॉडेलची देशभरात चर्चा झाली होती.




परंतु, गेल्या तीन आठवड्यांत रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने सोशल मीडियावर केरळची खिल्ली उडवण्यात आली होती. सध्या राज्यातील रुग्ण वाढीचा वेग चिंताजनक आहे.




केरळमध्ये 10 लाख लोकसंख्ये मागे असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येचं प्रमाण वाढताना दिसत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दहा लाख लोकसंख्येमागे 111 रुग्ण होते.


पण, 19 ते 26 सप्टेंबर या काळात 10 लाख लोकसंख्येमागे वाढणारे रुग्ण 158 झाले आहेत. सध्या देशात 10 लाख लोकसंख्ये मागे दिल्लीत सर्वाधिक 212 तर, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 169 रुग्ण आहेत. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या केरळमध्ये राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.


कलम 144 लागू


केरळ सरकारने राज्यात कलम 144 लागू केले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात जमाव बंदी असणार आहे. एका बाजूला देशात पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासारखी राज्ये थिएटर्स सुरू करण्याच्या तयारीत असताना केरळला जमावबंदी लागू करावी लागत आहे.


सध्या भारतातील एकूण रुग्ण संख्या 63 लाखांच्या पुढे गेली आहे. एका बाजूला अनलॉक-5 च्या गाईडलाईन्स आणि दुसरीकडे केरळमधील जमावबंदी, असे चित्र सध्या दिसत आहे.





Kerala imposed a crowd ban to curb the growing outbreak of corona


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा